मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार विटेकर यांच्या नागरी सत्काराचे सेलूत आयोजन
सेलू/परभणी : नवनिर्वाचीत राज्यमंत्री तथा सेलू-जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर आणि पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांचा भव्य नागरी सत्कार सेलू येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात शनिवारी २१ रोजी सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सभागृहात बैठक पार पडली. बैठकीमध्ये स्वागताध्यक्षपदी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांची, तर सन्मवयकपदी माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. या वेळी माजी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, किशोर जोशी, रामेश्वर राठी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीमध्ये विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून, नागरी सत्कार समारंभ यशस्वीरीत्या पार पाडण्याच्या दृष्टीने उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या वेळी पंडीत आरकुले, शिवाजी खेडकर, मारोती पंढरकर, रवि मुळावेकर, बाबा काटकर, अविनाश शेरे, डॉ.विलास मोरे, कल्याण पवार, मोहन खापरखुंटीकर, पांडूरंग कावळे, संतोष खाडप आदीसह नागरिकांची उपस्थिती होती.