सुभाषराव कुंभकर्ण यांचे निधन

सुभाषराव कुंभकर्ण यांचे निधन

सेलू : सुभाषराव शामराव कुंभकर्ण (वय ७२, रा.मोरेगाव, ता.सेलू जि.परभणी) यांचे शुक्रवारी, २० डिसेंबररोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मोरेगावचे सरपंच म्हणून त्यांचे गावाच्या विकासात मोठे योगदान राहिले आहे. सेलू येथील श्री कालिंकादेवी संस्थानचे अध्यक्षपदही त्यांनी भूषिविले. कासार समाजासह विविध समाजघटकांत त्यांच्या वावर होता. सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. त्यांच्या पार्थिवावर मोरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यावयासिक प्रवीण व नितीन कुंभकर्ण यांचे ते वडील होत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!