राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे पाच महत्त्वाची खाती
राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर
मुंबई : परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्रिपद देण्यात आले आहे. खातेवाटपात बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बाल विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
या खात्यांच्या माध्यमातून राज्याच्या आरोग्य, महिला आणि बालकल्याण, तसेच सार्वजनिक सुविधा क्षेत्रातील विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बोर्डीकर यांचा कार्यकौशल्य, जनसंपर्क आणि विकासात्मक दृष्टिकोन यामुळे त्यांना या महत्त्वाच्या खात्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यामुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाला नवी चालना मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये ३३ कॅबिनेट तर ६ राज्य मंत्र्यांचा समावेश होता. मात्र खाते वाटप जाहीर करण्यात आले नव्हते अखेर आता खाते वाटप जाहीर झाले आहे, गृहमंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृह निर्माण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकेड अर्थ खाते राहणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप