अध्यक्षपदी गजानन गायके, सुरेखा आकात उपाध्यक्ष
साळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समिती बिनविरोध
सेलू : तालुक्यातील साळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी गजानन गायके तर उपाध्यक्षपदी सुरेखा शिवाजी आकात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. २० डिसेंबररोजी शालेय व्यवस्थापन समिती निवडीसंदर्भात पालकांची बैठक बोलवण्यात आली होती. व्यवस्थापन समिती सदस्यपदाची निवड करून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. अध्यक्ष गजानन आबासाहेब गायके, उपाध्यक्षपदी सुरेखा शिवाजी आकात, सदस्य रामेश्वर गायके ,सुभाष भिसे, महादेव गायके, कालिदास आकात, वसिम सय्यद, योगीता राऊत, सुवर्णमाला गायके, अर्चना मस्के, वैशाली मस्के,अर्चना गायके, नसरिन शेख, अजिंक्य ढवळे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना गायके, शिक्षक प्रतिनिधी गजानन शितळे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मूख्याध्यापक भगवान पौळ, गोविंद रोकडे ,ईश्वर पौळ आदींची उपस्थिती होती.या निवडीचे सरपंच लक्ष्मण गायके, बाळू आकात, अशोक गायके, किशोर भिसे, दिपक मगर, उमद शेख , करीम सय्यद, राजू शेख, आनंद मस्के, नितीन मस्के, दगडू भिसे,आनंद भिसे आदींनी स्वागत केले.