श्रीराम प्रतिष्ठानच्या सुरभी महोत्सवाला सेलूत सुरुवात
पथसंचलन, प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष
सेलू/परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षातील ‘ सुरभि महोत्सव-२०२४ ‘ सुरूवात स्पोर्ट्स डे कार्यक्रमाने मंगळवारी (२४ डिसेंबर) सॅनरो नॉलेज सिटीच्या प्रांगणात उत्साहात झाली.
अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ.संजय रोडगे होते. उद्घाटन माजी नगरसेवक मिलिंद सावंत यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून झाले. प्रमुख पाहुणे म्हणून किशोर कटारे, सरपंच दीपक रोडगे, कैलास पवार, रोहिणी बोराडे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे उपस्थित होते. यानंतर एलकेआरआर प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय, प्राॅस्परस पब्लिक स्कूल, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, अपूर्वा पॉलिटेक्निक, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डॉ.राम रोडगे डीएड व बीएड कॉलेजच्या सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम या शैक्षणिक संकुलात होते, असे मत मिलींद सावंत यांनी यावेळी व्यक्त केले. डॉ.रोडगे यांनी रौप्यमहोत्सवी वाटचालीवर प्रकाश टाकत भविष्यातील ध्येयांविषयी माहिती दिली. प्रास्ताविक धम्मपाल ठोके यांनी केले. सूत्रसंचालन डिगांबर टाके, संदिप आकात व कल्पना भाबट यांनी केले. कार्यक्रमात संस्थेच्या तसेच घटक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.