सानेगुरूजींचे कार्य निरंतर प्रेरणादायी

सानेगुरूजींचे कार्य निरंतर प्रेरणादायी

नितीन लोहट यांचे प्रतिपादन, हेलस कथामालेच्या विभागीय कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

सानेगुरूजींचे कार्य निरंतर प्रेरणादायी

परभणी : सानेगुरुजी यांनी अल्पावधीच्या आयुष्यात सुसंस्कृत पिढ्या, समाज आणि  राष्ट्र निर्माणाचे कार्य उभे केले. म्हणून आजही गावागावातून तसेच शाळा शाळांतून सानेगुरुजींच्या विचारांचा जागर घातला जातो आहे. याद्वारे प्रत्येकाला आपापले कार्यकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सानेगुरूजींचे कार्य निरंतर प्रेरणादायी ठरणार आहे, असे प्रतिपादन परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक नितीन लोहट यांनी केले.

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाऊंडेशन जालना यांच्या वतीने आयोजित मराठवाडा विभागस्तरीय कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेत मंगळवारी, २४ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडली. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना नितीन लोहट बोलत होते. कथामालेचे जालना जिल्हाध्यक्ष डॉ.सुहास सदाव्रते, संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर, सतीश कुलकर्णी, बाबासाहेब हेलसकर, परीक्षक किशोर विश्वामित्रे, मोहन खापरखुंटीकर, दीपक रंगारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पूज्य साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय फेरीत मराठवाड्यातील एकूण २३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रारंभी सानेगुरूजी, राजामाता जिजाऊ, स्व.दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तुळशीराम हनवते आणि विद्यार्थ्यांनी ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना सादर केली. विजेत्या स्पर्धकांना जिजाऊ ज्ञानतीर्थचे अध्यक्ष रामराव लोहट गुरूजी यांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात लोहट यांनी वाचनाचे महत्व विशद करून कथाकथन सारख्या उपक्रमातून संस्काराचे सिंचन होते. समृद्ध व्यक्तिमत्त्व घडते, असे सांगितले. प्रास्ताविक कल्पना हेलसकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी केले. बाबासाहेब हेलसकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी बोबडे, लहू घरजाळे, एस.डी.पाटील, गजानन पोले, सदाशिव महाजन, शुभम टाके तसेच जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

स्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी :

बालगट : प्रथम संचिता सुभाषराव आष्टेकर (महात्मा फुले हायस्कूल, नांदेड), द्वितीय पार्थ बाळू इंगोले (नरहर कुरुंदकर विद्यालय, कुरूंदा), तृतीय अक्षरा गजानन पवार (नूतन कन्या प्रशाला, सेलू), उत्तेजनार्थ सानवी विजयकुमार वाघमारे (बालजगत विद्यालय, जालना), समीक्षा बालाजी तुडमे (यशवंत विद्यालय, अहमदपूर)
किशोर गट : प्रथम ऋतुजा ओमप्रकाश सोम्मारे (नरहर कुरुंदकर विद्यालय, कुरूंदा), द्वितीय अमृता अनिल कांबळे (अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालय, जालना), तृतीय तन्वी अशोक खडके (धाराशिव), उत्तेजनार्थ साक्षी कोंडिबा गंगथडे (यशवंत विद्यालय, अहमदपूर), मृणाल महेश कुलकर्णी (अरबिंदो अक्षरज्योती विद्यालय , परभणी)

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!