सेलूत संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सव
२८, २९ डिसेंबररोजी ख्यातनाम कलावंतांची सेलूत हजेरी
सेलू/परभणी : ज्येष्ठ संगीततज्ज्ञ संगीतरत्न पं.हरिभाऊ चारठाणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सहाव्या संगीत महोत्सवाचे आयोजन २८, २९ डिसेंबर रोजी सेलू येथे करण्यात आले आहे. सेलू येथील साई नाट्यगृहात रोज सायं ६.३० वा आयोजित महोत्सवात ख्यातनाम कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. जयपूर घराण्याच्या गायिका यशस्वी साठे सरपोतदार, यती भागवत (तबला सोलो), विदूषी पार्वती दत्ता यांचे शिष्यगण, मेवाती घराण्याचे गायक कृष्णराज लव्हेकर, उस्ताद विलायत खाँ यांच्या परंपरेतील युवा सतारवादक मेहताब अली नियाजी, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक धारवाडचे पं. कैवल्यकुमार हे कलाकार सहभागी होणार आहेत. साथसंगत शांतीभूषण देशपांडे, यश खडके, अनिरूद्ध देशपांडे, प्रशांत जोशी, स्वप्नील भिसे व यती भागवत करणार आहेत. रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संगीत महोत्सव संयोजन समिती व देवगिरी संगीत प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.