सोमनाथच्या कुटुंबियांना सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य कराव्यात

सोमनाथच्या कुटुंबियांना सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य कराव्यात

मनोज जरांगे पाटील : सोमनाथच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट

परभणी : सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी या पोलिसांना पाठीशी घालू नये. सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. कुटुंबियांनी केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य कराव्यात. त्या पूर्ण होईपर्यंत आणि न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहे, असे मराठा आरक्षण चळवळीतील नेते मनोज जरांगे यांनी सांगितले. श्री.जरांगे हे परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून बुधवारी, २५ डिसेंबर रोजी दुपारी त्यांनी परभणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदेालनस्थळी भेट दिली. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची तेथे भेट घेतली. न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री.जरांंगे यांना परभणीत झालेल्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यात आली. त्यानंतर जरांगे म्हणाले सोमनाथला अमानुषपणे मारहाण करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
दरम्यान, हृदयविकाराने निधन झालेले आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुंटुंबियांची भेट घेण्यासाठी श्री जरांगे हे राहुल नगरातील त्यांच्या निवासस्थानी पोहाचेले. श्री जरांगे यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांंत्वन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!