नूतन कन्या प्रशालेत माजी विद्यार्थिनी मेळावा

नूतन कन्या प्रशालेत माजी विद्यार्थिनी मेळावा

दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

सेलू : सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शनिवार व रविवार (२८, २९ डिसेंबर) माजी विद्यार्थिनी मेळावा आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशालेच्या प्रांगणात शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून नोंदणी, स्वागत, चहापान, मैत्रीभेटी, शालेय परिसर फेरफटका, ग्रंथप्रदर्शन व फोटो प्रदर्शन भरविण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता मनोरंजक खेळ, तर सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आहे. रविवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. नऊ वाजता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया असतील. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उद्योजक रामप्रसाद घोडके, संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर बाहेती आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
त्यानंतर ‘आम्ही कशा घडलो’ या विषयावर आजी विद्यार्थिनींशी सुसंवाद व मार्गदर्शन, तर ‘माझी शाळेविषयी कल्पना (सुधारणा, योजना) या विषयावर विद्यार्थिनी विचार मांडणार आहे. दुपारी दोन वाजता मुक्तचिंतन, मनोगत व समारोप आहे. मेळाव्यासाठी माजी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापिका निशा पाटील व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!