जिजाऊ टॅलेंट सर्च परीक्षेला प्रतिसाद
परभणीतील जिजाऊ ज्ञानतीर्थमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी परीक्षेची पूर्वतयारी
परभणी : येथील जिजाऊ ज्ञानतीर्थतर्फे दहावीतून अकरावी प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिजाऊ टॅलेंट सर्च स्कॉलरशिप परीक्षा २०२५ ला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीनुसार नीट या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात प्रा.नितीन लोहट आणि डॉ.सुनील मोडक यांनी नीट आणि जेईई परीक्षेच्या तयारीसाठी योग्य अभ्यासपद्धती, वेळेचे व्यवस्थापन, तसेच यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण झाली. या प्रसंगी डॉ.यशवंत सोनी, डॉ.सारिका लोखंडे, रितेश सिंग, नित्यानंद यादव, कुंदन कुमार यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. विद्यार्थ्यांचा विकास, पालकांचा विश्वास या ध्येयाने
जिजाऊ ज्ञानतीर्थ ही संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी सदैव कार्यरत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम मार्गदर्शन यासाठी जिजाऊ ज्ञानतीर्थने आपली खास ओळख निर्माण केली आहे.