मोठी स्वप्ने पाहा; आनंदी राहा
प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांचे आवाहन; श्रीराम प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

सेलू : सेलू् येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना लातूरच्या राजर्षी शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व सांगून मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि आनंदी राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र इंजिनियरिंग कॉलेजचे संचालक प्रा.महेश पाटील सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. रामराव रोडगे, डॉ.आदित्य रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, माणिकराव डख, डॉ.गणेश गायकवाड, प्रा.वंदना गायकवाड, डॉ.ज्ञानेश्वर नवल, डॉ.वर्षा नवल, डॉ.दीपक वानखेडे, डॉ.आकांक्षा वानखेडे, डॉ.मंजुनाथ हावळे, प्रफ्फुल बिनायके, तसेच घटक संस्थेतील सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. या स्नेह मेळाव्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान संचलित सर्व घटक संस्थांतील माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी, बिझनेसमन, सरपंच, शिक्षक, आणि समाजसेवक यांचा यामध्ये समावेश होता.
महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात डॉ.संजय रोडगे यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या ८०० स्क्वेअर फूट जागेपासून सुरू झालेल्या प्रवासाचे आजच्या १५ एकर कॅम्पसपर्यंतचे तीन लाख स्क्वेअर फुट बांधकाम झाले आहे. त्यांनी प्रतिष्ठानच्या प्रगतीमागील संघर्षमय प्रवासाची माहिती देऊन सर्वांना प्रेरणा दिली. कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या घटक संस्थांतील माजी विद्यार्थ्यांपैकी टॉप अचिव्हर्सचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.मोहकरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. श्रीराम प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमाने माजी विद्यार्थ्यांना आपल्या वर्गमित्राशी पुन्हा जोडण्याची संधी मिळाली. पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा निर्माण केली.