‘आयुष्यावर बोलू काही’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

‘आयुष्यावर बोलू काही’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

धर्मापुरीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानाच्या शाळा, महाविद्यालयात जल्लोषात कार्यक्रम

________
SAKASH NEWS                   https://chat.whatsapp.com/KNhQQNYmKEe49WgafxhdTH

परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय,ज्ञानसाधना NEET व JEE फाउंडेशन, ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूल ,बळीराजा सन्मान योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयुष्यावर बोलू काही…! वार्षिक स्नेहसंमेलन- 2024 चे 29, 30 व 31 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्ञानसाधना प्रतिष्ठान संस्थेच्या विविध शाखेतील वर्ग चौथी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनामध्ये उत्कृष्ट सहभाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला. यावेळी विविध थीमच्या माध्यमातून तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले होते.

रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय

धर्मापुरी येथील वर्ग चौथी ते दहावीच्या सेमी विभागातील विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी अशोक- लक्ष्या ही दोस्ती तुटायची नाय आणि द लिजेंड ए . आर.रहमान या थीमवर विविध डान्स व स्कीट चे सादरीकरण करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवसांभदादा सोनटक्के (राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक) हे उपस्थित होते.तर उद्घाटक म्हणून श्री मनोज भातलवंडे (वेतन अधीक्षक परभणी) , प्रमुख अतिथी श्री नारायण चौधरी, श्री संजय ठाकरे, श्रीमती छाया गायकवाड, श्रीमती मधुरा भातलवंडे, श्रीमती सरोज देशपांडे,श्रीमती मधुरा उमरीकर, विद्या लटपटे, सौ.शरयू वट्टमवार व प्रमुख उपस्थिती मध्ये प्रा श्री किरण सोनटक्के (अध्यक्ष-ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी) व प्रा.सौ.शीतल सोनटक्के (सचिव ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी), श्री बाबुराव गायकवाड यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नटराज देवतेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रा. सौ .शितल सोनटक्के व प्रा किरण सोनटक्के यांच्या हस्ते श्रीमती छाया गायकवाड यांचा महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षीकापुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती छाया गायकवाड यांनी ज्ञानसाधने मध्ये खरोखरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून येतो असे मत केले. तर प्रा.शितल सोनटक्के यांनी आपल्या प्रास्ताविकेत ज्याला येत नाही त्याला शिकवणारी शाळा म्हणजे ज्ञानसाधना प्रतिष्ठान असे सांगून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे असे मत व्यक्त केले.
आपल्या उद्घाटकीय भाषणामध्ये श्री मनोज भातलवंडे यांनी यश मिळवण्यासाठी परिश्रमाशिवाय गत्यंतर नाही असे सांगितले. तर प्रा. किरण सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना जीवन जगण्याचे कौशल्य शिकवणे म्हणजे खरे शिक्षण असे मत व्यक्त केले.
वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ही दुनिया मायाजाल, अश्विनी येना, हमाल दे धमाल, अशी ही बनवाबनवी ,मुकाबला पप्पू कान्ट डान्स साला, काले मेघा, रांझना ,आवारा भवरे या सुंदर गीतावर बहारदार असे नत्य व नाट्य सादर करण्यात आले .यावेळी शासकीय वैद्यकीय प्रवेशास (MBBS)पात्र गुणवंत विद्यार्थी, वर्ग दहावी बोर्ड परीक्षा, एन. एम. एम. एस. स्पर्धा परीक्षा, विज्ञान नाटिका व क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम पी.व्ही.यांनी केले. तर श्री खपरले एन. पी. यानी उपस्थितांचे आभार मानले.

बळीराजा सन्मान योजना विभाग

बळीराजा सन्मान योजना या विभागाच्या माध्यमातून बळीराजा जगाचा पोशिंदा या थीमवर शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट अशा नृत्यांचे व नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा.श्री किरण सोनटक्के (अध्यक्ष -ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी), उद्घाटक श्री ओम प्रकाश यादव (मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. परभणी), प्रमुख अतिथी डॉ. अभिजीत चिद्रावार (मोरया फाउंडेशन परभणी), श्री केशव अण्णा दुधाटे (ज्येष्ठ शिक्षक नेते),श्री शिवसांभ दादा सोनटक्के , डॉ.श्री शशांक सोमानी,डॉ.भावना चिद्रावार, श्री विक्रम देशमुख, श्री व सौ प्रदीप शेटे तसेच स्वागताध्यक्षा प्रा.शितल सोनटक्के यांची उपस्थिती होती. प्रसंगी आपल्या प्रास्ताविकामध्ये सौ शीतल सोनटक्के मॅडम यांनी शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असे सांगून शेतकऱ्यांची मुलं सुद्धा डॉक्टर, इंजिनीयर व प्रशासकीय सेवेमध्ये लागली पाहिजे . शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजेअसे सांगितले. तर आपल्या मनोगतामध्ये ओमप्रकाश यादव यांनी विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक अनुभव सांगत अथक परिश्रमाने निश्चितच यश मिळत असते असे मत व्यक्त केले.डॉ चिद्रावार यांनी ज्ञानसाधना प्रतिष्ठानने बळीराजा सन्मान योजना या युनिटच्या माध्यमातून गरजू व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी खरोखरच उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था केल्याबद्दल संस्था अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के व प्रा. सौ .शीतल सोनटक्के यांचे कौतुक केले. तसेच आपण सुद्धा या गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व इतर सुविधा निरंतर स्वरूपात देऊ असे जाहीर केले. तर आपल्या मनोगतामध्ये प्रा. किरण सोनटक्के यांनी पालकांची गरज लक्षात घेऊन *ना नफा ना तोटा या तत्त्वावर विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन दर्जेदार शिक्षण देऊन घडविणे या हेतूने बळीराजा सन्मान योजना या युनिटची सुरुवात केली असे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वर्ग सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा- एक असे सुंदर नृत्य सादर केले. त्यामध्ये *गणेश वंदना, आई तुझ्या ग चरणी, उमगाया बाप र,तुफान आलया, विजेता, लाल चिखल ,सण आला बैलपोळ्याचा, नंदीला सजवा , जय जवान जय किसान या सुंदर अशा गीतावर विद्यार्थ्यांनी बहारदार व हृदय द्रावक असे नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .सौ धुळे एस.डी. यांनी केले तर प्रा.भोपळे एम. पी. यांनी उपस्थितांचे आभार मानले.

तृतीय दिवशी स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी ज्ञानसाधना NEET व JEE फाउंडेशन च्या वतीने थीम- लाईफ इज ब्लीस व ट्रिब्यूट टू राजकपूर या सुंदर थीमवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादरीकरण व नाट्य सादरीकरण केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किरण सोनटक्के ,तर उद्घाटक म्हणून श्री दारासिंग खुराना (अभिनेता, मॉडेल व राष्ट्रकुल युवा चॅम्पियन) हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी श्री संजय ससाने (शिक्षणाधिकारी योजना), श्री राकेश खुराना, डॉ. दिनेश भुतडा , डॉ.सौ स्मिता भुतडा,भीमराव वायवळ, नसीर खान, जे.डी. सोमानी, सौ .अर्चना सोमानी,विक्रम खुराना, मुबस्सिर खान, श्री नांदे सर (गटशिक्षणाधिकारी), श्री शिवसांभ दादा सोनटक्के, सौ.गंगाबाई सोनटक्के, सचिव प्रा.सौ.शितल सोनटक्के आदींची उपस्थिती होती. यावेळी दारासिंग खुराणा यांनी व्यक्तीला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ एका कलेची अथवा कृतीची आवश्यकता असते जी तुम्हाला जीवनामध्ये आनंद देते असे मत व्यक्त केले. तर डॉ. दिनेश भुतडा यांनी करिअर पूर्ण करताना विद्यार्थ्यांनी आपले छंद सुद्धा जोपासले पाहिजे असे सांगितले. तसेच संजय ससाने यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी हेतू पुरस्सर वेळ दिला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर आपल्या अध्यक्षिय भाषणामध्ये प्रा. श्री किरण सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून योग्य दिशा देण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.

यानंतर राजकपूर यांच्या मेरा जूता है जापानी, आवारा हू, तसेच लाईफ इज ब्लिस या थीमवर बाल्यावस्था, युवाअवस्था, व वृद्धावस्था या जीवन प्रवासातील टप्प्यावरील पापा मेरे पापा,खुशिया देती है, अलबेला सॉंग, शिवतांडव, रिमिक्स या प्रकारच्या सुपरहिट गीतावर विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट नृत्य सादर केले. याप्रसंगी दहावी बोर्ड परीक्षा,NMMS व क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वार्षिक स्नेहसंमेलनासाठी नृत्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले कोरिओग्राफर, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी, मंडप डेकोरेशन सहाय्यक यांचे सर्वांचे सत्कार करण्यात आले. त्याचबरोबर नूतन वर्ष 2025 चे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सेलिब्रेशन करण्यात आले व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संस्थेचे सर्व समन्वयक, विभाग प्रमुख, प्राचार्य ,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर. एस. चाफे यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा.सौ. शितल सोनटक्के यांनी केले. श्री दडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशा या उत्कृष्ट विविध थीमच्या माध्यमातून संस्थेच्या विविध शाखेतून तब्बल 1500 विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.अत्यंत उल्हासमय वातावरणामध्ये आयुष्यावर बोलू काही या वार्षिक स्नेहसंमेलनाची राष्ट्रगीताने सांगता झाली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!