मंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्वीकारला पदभार
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, ऊर्जा, महिला व बालविकास, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता तसे सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांच्या माध्यमातून दिलेल्या जबाबदारीचा योग्य वापर करत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी व राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे – मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री
परभणी : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी बुधवारी, एक जानेवारी रोजी ऊर्जा, महिला व बालविकास, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता तसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. सकाळी मुंबई विधान भवनाकील दालन क्रमांक २१३, २१४ ए, बी मधील विभागाच्या मंत्रालयात त्यांनी कार्यभार स्वीकारला. या खात्यांच्या माध्यमातून दिलेल्या जबाबदारीचा योग्य वापर करत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी व राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या वेळी अमोल पाटील, नीना जाधव, स्वप्ना यादव, नयना दाते, राधिका अंबाड, स्नेहा चव्हाण, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, हरिभाऊलहाने, डॉ.केदार खटिंग, राजेश देशमुख, गोविंद थिटे, सुनील भोंबे, ॲड.दत्ता कदम, सुनील देशमुख, डॉ.उमेश देशमुख, सुभाष आंबट, प्रभाकर वाघीकर, अभिजित पारवे, रितेश जैन, श्रीकांत अंबोरे, संतोष देशमुख, भगवान कऱ्हाळे आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.