विद्यार्थ्यांचे शाळाप्रवेश घटले; ३७ लाखांची घट
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : देशभरात शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सन २०२३- २४मध्ये ३७ लाखांनी घटल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाच्या ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन (यूडीआयएसई) प्लस’ या व्यासपीठावरील नोंदणीवरून समोर आली आहे. या वर्षी २४.८० कोटी विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे.
शाळाप्रवेश
२०२२-२३ – २५.१७ कोटी
२०२३-२४ – २४.८० कोटी
घटलेली संख्या – ३७ लाख
मुलांच्या संख्येत घट २१ लाख
मुलींच्या संख्येत घट १६ लाख
अल्पसंख्याकांचे प्रमाण
• नोंदणीकृत विद्यार्थ्यांमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण २० टक्के
• यामध्ये मुस्लिम ७९.६ टक्के, ख्रिश्चन १० टक्के, शीख ६.९ टक्के, बौद्ध २.२ टक्के, जैन १.३ टक्के, पारशी ०.१ टक्का
यूडीआयएसई प्लसवर नोंदणीकृत विद्यार्थ्याचे प्रवर्गानुसार प्रमाण
खुला प्रवर्ग २६.९ टक्के
अनुसूचित जमाती ९.९ टक्के
अनुसूचित जाती १८ टक्के
ओबीसी ४५.२ टक्के
प्रथमच विद्यार्थ्यांनुसार माहिती
याआधी शाळांनुसार माहितीचे संकलन केले जात होते. मात्र आता प्रथमच विद्यार्थ्यांनुसार माहितीचे संकलन केले जात आहे. त्यामुळे शैक्षणिक सुविधेचे योग्य चित्र समोर येणार आहे. त्यामुळे बोगस विद्यार्थी ओळखून त्यांच्यावर होणारा खर्च होतकरू विद्यार्थ्यांसाठी वळवण्यात येऊ शकेल, हा या मागील उद्देश आहे.
Credit -वृत्तसंस्था/मटा – Photo credit – MeTa-AI