सेलूमध्ये मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण उत्साहात
सेलू : तालुक्यामध्ये ‘सुरक्षा व सुरक्षितता’ या उपक्रमाचे मुख्याध्यापकांसाठीचे सेलू तालुकास्तरीय प्रशिक्षण उत्साहात पार पडले. हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबवण्यात येत असून परभणी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील पोलास यांच्या सूचनेप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची मुख्याध्यापक उपस्थित होते .या प्रशिक्षणाचा शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.