राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा :  महाराष्ट्र संघाची दोन सुवर्ण, रौप्य, कांस्यपदकांची कमाई

राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा :  महाराष्ट्र संघाची दोन सुवर्ण, रौप्य, कांस्यपदकांची कमाई

राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा :  महाराष्ट्र संघाची दोन सुवर्ण, रौप्य, कांस्यपदकांची कमाई

परभणी :  भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाच्या वतीने गाझीपूर उत्तरप्रदेश येथे ३१ डिसें २०२४ ते २ जाने २०२५ दरम्यान  राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धासंपन्न झाल्या. यामध्ये महाराष्ट्र संघांने सुवर्ण कामगिरी केली. सबज्युनियर मुली व मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदक तर ज्युनिअर मिश्र दुहेरीत रौप्यपदक, तर ज्युनिअर मुली गटात कांस्यपदक पटकावले. सब- ज्युनिअर मिश्र दुहेरी सुवर्णपदक महाराष्ट्र वि. उत्तरप्रदेश दरम्यान महाराष्ट्र संघाने 2-0 सेटमध्ये महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले. रणवीर भोसले (पुणे), सोनाक्षी कदम (पुणे) प्रशिक्षक:- निनाद रहाटे(सबब मुंबई) सब – ज्युनिअर मुली सुवर्णपदक अंतिम सामना महाराष्ट्र वि. झारखंड दरम्यान महाराष्ट्र संघाने 2-0 सेट मध्ये उत्तरप्रदेश चा पराभव करत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले. यात तनुजा रांजणे(पुणे) सृष्टी शिंदेवैष्णवी माने (सांगली)अवनी कांबळे, (नाशिक) प्रांजल सूर्यवंशी, चैताली चौधरी (जळगाव),प्रशिक्षक:- मिलिंद कुलकर्णी ज्युनिअर मुली : कांस्यपदक~महाराष्ट्र वि. दिल्ली दरम्यान अतितटी च्या सामन्यात 2-1 सेट मध्ये महाराष्ट्र संघाने कांस्यपदक पदक पटकावले. यात मधुरा हवलदार,किर्ती सोळांकुरकर (सांगली)सुलशा कपासी, श्रावणी वळंजू (सबब मुंबई) नीतूकांवर चौहान,(छ.संभाजीनगर) , गायत्री गायके(परभणी)
प्रशिक्षक:- मिलिंद कुलकर्णी (सांगली) मिश्र दुहेरी ज्युनिअर: रौप्यपदक , अंतिम सामना हिमाचल प्रदेश वि. महाराष्ट्र दरम्यान हिमाचल प्रदेश संघाने महाराष्ट्र संघाचा 2-0, हिमाचल प्रदेश सुवर्णपदक तर महाराष्ट्र संघास रौप्यपदक पटकावले. यात सार्थक माळकर(परभणी),
तपस्वी पगारे(नाशिक) प्रशिक्षक:- निनाद रहाटे मॅनेजर :- अंकिता पाटील (जळगाव),अंबादास उंदरे, व्यंकटेश महाले (छ.सभाजीनगर)
ज्युनिअर मुले चौथा क्रमांक पटकावला यात नील मयेकर (सबब मुंबई) मयूर बोरसे, प्रतीक बच्छाव (नाशिक), प्रसाद महाले (परभणी) रोशन चव्हाण (जळगाव)पवन खांडगे (छ.संभाजीनगर)सब- ज्युनिअर मुले: चौथा क्रमांक:विवेक सिंह,करण जाधव (ठाणे)आर्यन गायके (परभणी),गौरव चौधरी(मुंबई शहर) दत्तात्रय कळसकर , राज आळंजकर (छ.संभाजीनगर) यशस्वी खेळाडूंचे  टेनिस व्हॉलीबॉल चे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे, राज्य कार्याध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ , उपाध्यक्ष आनंद खरे, रामेश्वर कोरडे, किशोर चौधरी, राज्य कोषाध्यक्ष डॉ.दिनेश शिगारम, जिल्हा सचिव सतीश नावाडे, प्रा.नागेश कान्हेकर, विभागीय सचिव प्रमोद महाजन आदींनी अभिनंदन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!