ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलच्या नूतन वास्तूचे उद्घाटन गंगाबाई शिवसांभ सोनटक्के यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व बालिका दिनाचे औचित्य साधून उत्साहात संपन्न झाले
अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव प्रा.शितल सोनटक्के, उमादेवी धुळे, मंगेश कवुटकर, सोमनाथ पांचाळ आदींसह  समन्वयक शर्मा एम. एस., विभागप्रमुख प्रा.कदम पी. व्ही., प्रा.निकम जे.टी., प्रा.थोरात एस.बी., चाफेकानडे ए.व्ही.,  सामाले वाय.व्ही., सावंत एम. एस.,प्रा गायकवाड जी.पी. उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सुरसागर गीत संच यांच्यावतीने स्वागत गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या सचिव प्रा.सौ.शितल सोनटक्के यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकून मुलींना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूनेच ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलची स्थापना झाली. गुणवत्तेच्या बळावर सर्व पालकांचा विश्वास सार्थ करत ही शाळा उभी राहिली. येथे दहावी, बारावी बोर्ड परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेतून गुणवंत विद्यार्थी घडतात असे मत व्यक्त केले. तर आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रा.किरण सोनटक्के यांनी ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलच्या प्रवासामध्ये आलेल्या विविध अडचणीला तोंड देत कशाप्रकारे पब्लिक स्कूलची इमारत तयार झाली. तसेच पालकांचा विश्वास आयुष्यात व भविष्यात सुद्धा असाच सार्थक करू असे मत व्यक्त केले.
यावेळी पब्लिक स्कूलमध्ये गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत असलेले समन्वयक श्री शर्मा एम.एस.,विभागप्रमुख चाफेकानडे ए. व्ही., सामाले वाय.व्ही.,सौ.सावंत एम. एस., प्रा.गायकवाड जी.पी. यांचा सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर इमारतीचे सुंदर असे बांधकाम केल्याबद्दल श्री नसीर भाई तसेच निरीक्षक शरद कनकापुरे यांचा सुद्धा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यालयांमध्ये सतत मागील पाच वर्ष उत्कृष्ट सेवा देणारे मुख्याध्यापक  कुलकर्णी ए.पी., सहशिक्षिका  कऱ्हाळे के. पी., कोरडे ए . एस., सहशिक्षक गरजे एस.एल., बचाटे व्ही.आर.तसेच चालक  तुकाराम नवघरे, प्रताप कोके,  माऊली झटकवडे,  दीपक गायकवाड यांचा सुद्धा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विभागप्रमुख प्रा.निकम जे. टी., प्रा.थोरात एस. बी.,  कदम पी . व्ही.यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मागील वर्षी विद्यालयातील श्रेया परीक्षा, ऑलंपियाड परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एन. एम. एम. एस. स्पर्धा परीक्षा, एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्ड परीक्षा 2024 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासमवेत सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गौरी माने, अश्विनी कवरे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच समन्वयक, विभागप्रमुख यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये आपल्या विभागातील सर्व माहिती पालकांना दिली. यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटक सौ. गंगाबाई शिवसांभ सोनटक्के यांच्या हस्ते रीतसर नूतन वास्तूचे रिबन कट करून उद्घाटन करण्यात आले. तसेच समन्वयक व विभाग प्रमुख यांच्या हस्ते सुद्धा विविध वर्ग खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पत्की एन.वाय. यांनी केले. तर प्रा कदम पी. व्ही.यांनी उपस्थितांचे आभार मानले. अत्यंत उल्हासमय वातावरणामध्ये भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमासाठी ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलचे समन्वयक विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!