सेलू, जिंतूरमध्ये भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरु

सेलू, जिंतूरमध्ये भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरु

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी नोंदविला सहभाग 

सेलू/परभणी : जिंतूर, सेलू तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून, रविवारी ( ५ जानेवारी) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अभियानामध्ये सहभाग नोंदविला. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्री बोर्डीकर यांनी सेलू येथील रायगड कॉर्नर, लोकमान्य टिळक पुतळा परिसर, नूतन रोड, संत श्री गोविंद बाबा चौक मठगल्ली, भाजपा संपर्क कार्यालय बस स्थानक तसेच मोरेगाव, वालूर येथील अभियान स्थळी भेट दिली. या वेळी भाजप सेलू तालुकाध्यक्ष ॲड. दत्ता कदम, डॉ.संजय रोडगे, अशोक अंभोरे, अशोक सेलवाडीकर, संदीप बोकन, कपिल फुलारी, माऊली ताठे, प्रसाद खारकर, रूपाली ठाकूर, संध्या चिटणीस, बबीता ठाकूर, गणेश काटकर, जयसिंग शेळके, शिवाजी खेडकर, अजय डासाळकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!