सेलूतील सांस्कृतिक चळवळीत पत्रकारांचेही मोठे योगदान
डॉ.संजय रोडगे यांचे मत, श्रीराम प्रतिष्ठान येथे दर्पण दिन उत्साहात
सेलू : सेलू शहराची सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख निर्माण करण्यामध्ये शहरातील पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे मत श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी मंगळवारी, ७ जानेवारी रोजी व्यक्त केले. श्रीराम प्रतिष्ठान येथे दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात डॉ.रोडगे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील, राम सोनवणे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, डॉ.विलास मोरे, मोहन बोराडे, दिलीप डासाळकर, शिवाजी आकात, मोहम्मद इलियास, संजय मुंडे, जयचंद खोना, मोहसीन मामू, शिवाजी शिंदे, निरज लोया, निशिकांत रोडगे, सतीश आकात, आबरार बेग, दीपक जडे, संदीप वरकट आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ.संजय रोडगे म्हणाले की, २०२५ हे वर्ष श्रीराम प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. ज्या ठिकाणी स्पर्धा असते त्या ठिकाणी विकासाला वाव असतो. परंतु कष्ट करत असताना इमानेइतबारे केले तर नक्कीच जीवनामध्ये यश प्राप्त होते. जीवनामध्ये समाजासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत. त्या करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. आम्ही जे काही संस्थेच्या माध्यमातून काम करतो त्याला आपल्या लेखणीतून समाजापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचविण्याचे काम आपण करत आहात. त्यामुळे एक चांगली ओळख निर्माण होण्यासाठी मदत होत असते. ज्याप्रमाणे सेलू शहराची जी सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण झालेले आहे ते केवळ आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात झालेली आहे. यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. याप्रसंगी राम सोनवणे, डॉ.विलास मोरे व मोहम्मद इलियास यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दिगंबर टाके यांनी केले. तर आभार प्रा.महादेव साबळे यांनी मानले.