सेलू पालिका निवडणुकीत विकासासोबत राहा
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे आवाहन
सेलू/परभणी : गत सहा वर्षांत सेलू् शहरातील डि.पी.रस्त्यांना प्राधान्यक्रम देत पथदिवे,ज्ञनाल्या, फुटपाथ इत्यादी विकासाचे कामे करण्यात आली. यामुळेच सेलू शहरातील नागरिक भाजपासोबत आहेत तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीतही विकासासोबत जनतेने राहून आपल्या विचाराची पालिका निवडून आणण्याचे आवाहन माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी बुधवारी, ८ जानेवारी रोजी केले
श्री शंकरलिंग मंदीर देवस्थान सभागृह बांधकाम व फुलेनगर येथे सिमेंट रस्ता भूमिपूजन प्रसंगी माजी आमदार बोर्डीकर बोलत होते.. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष अशोकआप्पा वाडकर, परभणी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.ऋतुराज साडेगावकर, तालुकाध्यक्ष ॲड.दत्ता कदम, शहाराध्यक्ष अशोक अंभोरे, शिवाजी खेडकर, भाऊ सोनवणे, गणेश काटकर, मुख्याधिकारी युवराज पौळ, अभियंता नागेश पैठणकर, धुळगंडे, बालासाहेब सरकाळे, दिनकर वाघ आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना बोर्डीकर म्हणाले की, विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आमदार मेघना बोर्डीकर यांनी गत पाचवर्षात कामे केली असल्याने समाजातील व्यक्तींनी भरभरून मतदान केले म्हणून आज आमदार मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. आम्ही देखील तेवढ्याच ताकदीने उभे राहून शहारातील गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. समाजातील गरजा ओळखून त्यांना प्राधान्यक्रम दिला पाहिजे. या मताचा मी आहे. कोणत्याही समाजाचे काम करताना दुजाभाव न ठेवता सर्वांगीण विकास व्हावा. यासाठी प्रयत्न करणार आहे. शहरातील रस्ते, नाल्या, फुटपाथ, पथदिवे, स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करून शहरात विकास केला जाणार आहे. यासाठी आपण सर्वांनी हिंदुत्व हा विचार मनात ठेवून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. देशात नरेंद्र मोदी, तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असल्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमच्या विचारांची नगरपालिका आमच्या ताब्यात द्या. मग विकास कामे कशी होतात ती बघा, असे आवाहन माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी केले.
सूत्रसंचालन सचिव प्रा.मिलिंद झमकडे यांनी केले. आभार निलेश मिटकरी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी गणेश गोरे, अर्जुन बोरुळ, शबाळू काजळे, सुनील चव्हाण, प्रकाश शेरे, ,कपिल फुलारी, दत्ताआप्पा मिटकर , बबन आप्पा झमकडे, राजेंद्रआप्पा नावाडे, राजेंद्रआप्पा महाजन, अरुणआप्पा सोळंके, वाल्मीक खुळे, मोहन माने, पप्पू शिंदे, विठ्ठल कोकर, अशोक कोपुलवार, सुनील काळे, सुनील चव्हाण, गणेश ढेंगळे, आण्णा केवारे, शिवकुमारआप्पा नावाडे, कानडेआप्पा, निजलिंग तरवडगे आदींनी पुढाकार घेतला.