सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन रंगले

सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन रंगले

सांस्कृतिक कार्यक्रमासह आनंदनगरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन रंगले

सेलू जि.परभणी : सेलू येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा आदी कार्यक्रमांनी रंगले. यानिमित्ताने शाळेच्या प्रांगणात आनंदनगरी भरविण्यात आली होती. विविध खाद्यपदार्थाचे २६ स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते. विद्यार्थी व पालकांनी याचा आस्वाद घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समिती अध्यक्ष अशोक काकडे यांच्या हस्ते झाले. या वेळी संतोष कुलकर्णी , ॲड. अशोकराव फोफसे, ॲड.गोविंद शेळके, चव्हाण महाराज, मुख्याध्यापक बी.ए.नाईकनवरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, रामेश्वर गाडेकर, शेषराव नागरे, दिनकर नखाते आदींची प्रमुख उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कीर्तन, लोकगीत, भावगीत यासोबतच विविध सामूहिक नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. सूत्रसंचालन जी.के. तोटेवाड यांनी तर रामेश्वर गाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद मगर, सुनील मोरे, प्रनयना तेलगोटे, मंजुषा बोराडे, बुरकुले, एस.डी.कुलकर्णी, बी.बी.निकम, एस.आर.रोटेवाड बाबासाहेब आव्हाड, एम.एस.बेग, विष्णू गजमल, नारायण काष्टे, अंगद मोरे आदींनी सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!