संत श्री भगवान बाबा पुण्यतिथी : वालूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आजपासून

संत श्री भगवान बाबा पुण्यतिथी : वालूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आजपासून

कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम

संत श्री भगवान बाबा पुण्यतिथी : वालूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आजपासून

सेलू : वालूर (ता.सेलू) येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह दरम्यान श्रीमद् भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, किर्तनांसह धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुरूषोत्तम महाराज चौथरी वालूरकर यांच्याहस्ते सप्ताहास शनिवारी (११ जानेवारी ) प्रारंभ होणार. नारायण बुवा पाठक हे भागवत कथा निरूपण करणार आहेत. अकरा ते १८ जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रवचनकार व कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. शनिवारी शंतनू महाराज पाठक वालूरकर, रविवारी पुरूषोत्तम महाराज चौधरी,सोमवारी किशोर महाराज खाडे, मंगळवारी कृष्णा महाराज रासवे, बुधवारी योगेश महाराज आकात, गुरुवारी विठ्ठल महाराज उमरीकर, शुक्रवारी जयराम महाराज तांगडे, यांचे कीर्तन रात्री साडे आठ ते साडे दहा या वेळेत होणार आहे. त्याच बरोबर पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते ३ श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ११ते ४ सकाळी ४ हरीजागर.

शनिवारी सकाळी ११ते १ सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!