शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत नूतन विद्यालयाचे घवघवीत यश
निकाल ९२.५ टक्के; दोन विद्यार्थी ए श्रेणी तर तीन विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त
सेलू : शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा २०२४ इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात नूतन विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. यावर्षी नूतन विद्यालयाचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९२.५ टक्के लागला असून नूतन विद्यालयाचे दोन विद्यार्थी ए ग्रेड तर तीन विद्यार्थ्यांनी बी ग्रेड प्राप्त केला आहे. वीस विद्यार्थी सी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
शासनाच्या महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी नूतन विद्यालय सेलू केंद्र होते. या परीक्षेत नूतन विद्यालयाच्या सिद्धेश्वर रामेश्वर इंगळे, अवंतिका मारुती आढे या विद्यार्थ्यांनी एक ग्रेड प्राप्त केला तर मान्यता विलास तावरे, पलश दीपक भुक्तर, प्रणाली दिपक मुळे यांना बी ग्रेड प्राप्त झाला आहे. शाळेतील २० विद्यार्थी सी ग्रेड प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, डॉ शरद कुलकर्णी, संस्थेचे पदाधिकारी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. परीक्षा यशस्वीतेसाठी चित्रकला विभाग प्रमुख आर.डी.कटारे कलाशिक्षक फुलसिंग गावित यांनी परिश्रम घेतले.