‘अलफ्लाह’ च्या वतीने सेलूतील पत्रकारांचा सन्मान
सेलू : दर्पण दिन आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साईबाबा बँकेच्या सभागृहात अलफ्लाह एज्युकेशन अँड वेलफेअर संस्थेच्या वतीने शहरातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इंजि.अनिस कुरेशी होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष महेमूदसर यांनी केले. सूत्रसंचालन शेख मौजम यांनी केले. उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. १६ फेब्रुवारी रोजी ४ थी ते ७ वी, ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती या वेळी देण्यात आली. कोषाध्यक्ष निसार पठाण, सहसचिव शेख हारूण, शेख शमशोद्दीन, असगर शेख, शेख इम्रान कुरेशी, इमाम, जावेद घोरी, जकीसर आदींची उपस्थिती होती.