आहेरबोरगावच्या नितीन विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा

आहेरबोरगावच्या नितीन विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

सेलू : शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा २०२४ इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव च्या विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल १००% टक्के लागला असून यात चार विद्यार्थी ए ग्रेड मध्ये तर दोन विद्यार्थी बी ग्रेड उत्तीर्ण झाले आहेत. ईश्वरी राम लिपणे, प्रांजल ज्ञानेश्वर लहाने, समर्थ संपतराव लिपणे, वैभव गजानन मोगरे या विद्यार्थ्यांनी ए ग्रेड प्राप्त केला आहे तर साक्षी विठ्ठल आवारे, शिवकन्या कैलास मोगरे या दोन विद्यार्थिनीने बी ग्रेड प्राप्त केला आहे. इतर आठ विद्यार्थी सी ग्रेडने उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इंटरमिजिएट व एलिमेंट्री परीक्षेचे नितीन माध्यमिक विद्यालय हे केंद्र होते. केंद्राचाही निकाल शंभर टक्के लागला असून या केंद्रावर सेलू शहर व परिसरातील शाळेतील ८६ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संतोष ताल्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र काका लहाने, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!