रेखाकला परीक्षेत न्यू हायस्कूलचे उज्ज्वल यश
सेलू : शासकिय चित्रकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 2024-25 निकाल नुकताच जाहीर झाला आहे. न्यू हायस्कूल सेलूचा रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. कोमल माडगुळे या विद्यार्थिनीला ए ग्रेड तर पाच विद्यार्थ्यांना बी ग्रेड तर इतर 4 विद्यार्थी पास झाले आहेत. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सुनील मोरे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी तसेच कलाशिक्षक यांचे मुख्याध्यापक बी.ए.नाईकनवरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.