नीट, जेईई तयारीसाठी “आकाश” परभणीमध्ये
तज्ज्ञ शिक्षकांची टीम, पालकांचा लाखोंचा खर्च वाचणार
परभणी : देशभरात नीट, जेईई आणि फाउंडेशनसाठी प्रसिद्ध असलेल्या शिक्षणक्षेत्रातील इंटरनॅशनल ब्रॅंड आकाश इन्स्टिट्यूटच्या परभणी शाखेचे उद्घाटन महाराष्ट्राचे प्रमुख अभिषेक कुमार सिन्हा यांच्या हस्ते रविवारी, १२ जानेवारी रोजी वसमत रोडवरील सहयोग मंगल कार्यालयासमोरील इमारतीत झाले. उद्घाटनप्रसंगी अभिषेक कुमार सिन्हा यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. याठिकाणी इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालणार आहेत. ज्या शिक्षणासाठी विद्यार्थी नांदेड, लातूर , छत्रपती संभाजीनगर व कोटा सारख्या ठिकाणी जायचे. तेच शिक्षण आता परभणी शहरात उपलब्ध झाले आहे. वातानुकूलित वर्गखोल्यासह शिक्षणाच्या सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डीपीपी, विकली टेस्ट तसेच डाऊट सोल्यूशनची व्यवस्था आणि मार्गदर्शनासाठी राज्याबाहेरील तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी २५ ते शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठीची प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती परभणी शाखेचे प्रमुख राघवेंद्र मेढे यांनी दिली. या कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.