ज्ञानसाधना फार्मसीमध्ये ‘आगाज’ महोत्सव उत्साहात
परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी व ज्ञानसाधना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वतीने १० व ११ जानेवारी रोजी ‘आगाज’ हा तरुणाईच्या नव्या नवलाईचा हा महोत्सव उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के होते. या वेळी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मनोरंजनातून अभ्यास करावा. महाविद्यालयीन जीवन खूप सुंदर आहे. ते आनंदाने आणि शिस्तबद्धरित्या जगले पाहिजे, असे मत प्रा.सोनटक्के यांनी या वेळी व्यक्त केले. विद्यापीठात सर्वोच्च गुणवत्ता सिद्ध करणार्या विद्यार्थ्याला ज्ञानसाधनातर्फे एक लाख रुपयांचे तसेच विविध परीक्षेतील गुणवंतांना लॅपटॉप बक्षीस दिले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रमुख पाहुण्या शीतल सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी विविध सांस्कृतिक स्पर्धा झाल्या. अलका बल्लाळ व विठ्ठल भोसले, विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एम.डी.सलाउद्दीन यांनी केले. प्राध्यापिका एस.एस.वाळके आणि एम.ई. पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डी.व्ही. सूर्यवंशी यांनी आभार मानले.