गोवा ते कन्याकुमारी सायकलिंग यशस्वी

गोवा ते कन्याकुमारी सायकलिंग यशस्वी

परभणी फाउंडेशनतर्फे अभिनंदन व सत्कार

परभणी :  परभणी फाउंडेशनच्या वतीने आज परभणी स्थानकावर जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणीचे सचिव नितीन सर, अरुण आडे सर, आणि गंगाराम कराळे सर यांचा सत्कार करण्यात आला. या तिघांनी 10 दिवसांत गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यांमधून 1,200 किलोमीटर अंतर सायकलिंगद्वारे यशस्वीपणे पार केले. सदर प्रवास प्रेरणादायी ठरला असून, त्यांनी पर्यावरण जागृती, ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’, शेतकऱ्यांचे हक्क आणि जनजागृती यांसारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक संदेशांचा प्रसार केला.

शारीरिक आणि मानसिक दृढतेचा आदर्श प्रवासादरम्यान अनेक आव्हानांवर मात करून त्यांनी एकजूट आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली. हा प्रवास शारीरिक आणि मानसिक दृढतेचा आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. परभणी फाउंडेशनच्या वतीने झालेल्या सत्कार कार्यक्रमात सर्व सदस्यांनी या उपक्रमाला एक नवीन उंची देणारा प्रवास म्हणून गौरवले. त्यांच्या संयम, एकता, आणि प्रेरणेचे कौतुक करत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच फाउंडेशनच्या वतीने नितीन लोहट, अरुण आडे, आणि गंगाराम कराळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!