सेलूतील ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलूतील ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयाचा उपक्रम

सेलू/परभणी : सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२५ या उपक्रमात अंतर्गत सोमवारी व मंगळवारी (१३, १४ जानेवारी ) आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला वाचक, शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सेवानिवृत्त ग्रंथपाल हरिभाऊ चौधरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खारकर होते. या वेळी सचिव चंद्रशेखर मुळावेकर, संजय विटेकर, ग्रंथपाल महादेव आगजाळ, अजित मंडलिक, गंगाधर गुंजकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी श्री.चौधरी म्हणाले, ” ज्ञानकक्षा रूंदवण्यासाठी वाचन संस्कार जपणे गरजेचे. वाचन हे माणसाचे अंतर्मन, व्यक्तिमत्त्वाला उभारी देते. ज्ञानाधिष्ठित व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी वाचन केले पाहिजे. पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे”  ग्रंथ प्रदर्शनाला शहरातील यशवंत विद्यालय , कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, केशवराज बाबासाहेब विद्यालय आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धनश्री देशमुख, अवचार, पांडुरंग पाटणकर, दिपक गजभारे, आरेवाड , किशोर खारकर, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!