आंतरराष्ट्रीय गणितीय ओलंपियाड : प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांचेअपूर्व यश
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 2025 च्या आंतरराष्ट्रीय गणितीय ओलंपियाड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील रँक मिळवलेले विद्यार्थी:
1. प्रज्वल रोडगे – आंतरराष्ट्रीय प्रथम क्रमांक
2. प्रेरणा काष्टे– चौथा आंतरराष्ट्रीय क्रमांक
3. ह्रिधन जोगदंड l – सातवा आंतरराष्ट्रीय क्रमांक
4. हर्षवर्धन बोरकर – 21 वा आंतरराष्ट्रीय क्रमांक
5. मंजिरी खालसे – 46 वा आंतरराष्ट्रीय क्रमांक
6. उन्नती राठी – 66 वा आंतरराष्ट्रीय क्रमांक
7. अर्णेश नाईकनवरे – 71 वा आंतरराष्ट्रीय क्रमांक
दुसऱ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थी: मंजिरी खालसे, प्रांजल सानप, समर्थ सुरवसे, उन्नती राठी, विराज पॉल, प्रेरणा कष्ठे, प्रज्वल रोडगे, गौरी अबुज, सृष्टी कदम, कार्तिक अबुज, अनिकेत आंबेकर. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल डॉ. संजय रोडगे, अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान सेलू, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “हे यश कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या समर्पणाचे फलित आहे. आम्हाला त्यांच्या यशाचा अभिमान आहे.” प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. संजय रोडगे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, नारायण चौरे, अर्जुन गरुड यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सविता रोडगे, सचिव श्रीराम प्रतिष्ठान, महादेव साबळे, प्रशासकीय अधिकारी, आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते. शाळेने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हे यश केवळ विद्यार्थ्यांचेच नाही, तर त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचेही आहे. शाळेच्या प्रोत्साहनपर वातावरणामुळेच विद्यार्थ्यांना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल विद्यार्थ्यांचे यश हे भविष्यातील मोठ्या स्वप्नांची नांदी आहे. या यशामुळे शाळेने आणखी एक इतिहास घडवला आहे! सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!