रौप्यमहोत्सवी नितीन चषक क्रिकेट स्पर्धेचे सेलूमध्ये शानदार उद्घाटन

रौप्यमहोत्सवी नितीन चषक क्रिकेट स्पर्धेचे सेलूमध्ये शानदार उद्घाटन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नितीन कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळांच्या वतीने आयोजन

सेलू : आयुष्यात कोणत्याही गोष्टीत सातत्य, जिद्द व चिकाटी असेल तरच यशाचे शिखर सहज पादाक्रांत करता येते. हेच या “नितीन चषक” स्पर्धेच्या माध्यमातून दिसून येत आहे. असे प्रतिपादन परभणीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी “नितीन चषक ” क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील नितीन कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय ” नितीन चषक” क्रिकेट स्पर्धेच्या रोप्य महोत्सवी स्पर्धेचे शानदार उदघाटन बुधवारी , १५ जानेवारी रोजी झाले.
येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित स्पर्धेचे उद्घाटक म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने होते. व्यासपीठावर श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे सचिव संतोष बोबडे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश बिहाणी, डॉ.अशोक नाईकनवरे, ॲड.दत्तराव कदम, नामदेव डख, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, नारायणराव भिसे, मिलिंद सावंत, गटकळ अकॅडमीचे संचालक रामेश्वर गटकळ, न्यू अरिहांत गॅस एजन्सीचे पारस काला, दिनकर वाघ, रवी कुलकर्णी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. प्रा.नागेश कान्हेकर यांनी आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!