शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा : प्रिन्स इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा : प्रिन्स इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के

सेलू : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2024 मध्ये श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा निकाल शंभर टक्के आहे. इंटरमिजिएट परीक्षेतील यश:
ग्रेड A: क्षितिजा कैलास खजिने, ग्रेड B: आदित्य मधुकर कटारे, युवराज विनोद सोळंके, ग्रेड C: तीन विद्यार्थ्यांनी मिळवले. ईलेमेंटरी परीक्षेतील यश: ग्रेड A: प्रणव पांडुरंग मुजमुले, सोनाली रंगनाथ सोनवणे, ग्रेड B: कार्तिक श्रीहरी अबुज, कृष्णा पांडुरंग काकडे, पृथ्वीराज दत्तराव हरकळ, श्रुती सुनील काटे, स्वप्निल पांडुरंग गंगे, वैभव संजय बोडखे ग्रेड C: एकूण 8 विद्यार्थी. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कलाशिक्षक महादेव बोरकर यांचे विशेष कौतुक करण्यात आले. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!