सेलूतील अकराशे महिलांनी घेतला मोफत प्रशिक्षणाचा लाभ
शुभंकरोती आणि देसाई फाउंडेशन यांच्यामार्फत विविध व्यावयायिक प्रशिक्षण
सेलू : शुभंकरोती फाउंडेशन आणि देसाई फाउंडेशन यांच्यातर्फे घेण्यात येत असलेल्या शिलाई प्रशिक्षण ,संगणक प्रशिक्षण व पार्लर प्रशिक्षणाच्या अकराव्या बॅच्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. अध्यक्षस्थानी समाजसेविका रजनी लक्ष्मीकांतराव सुभेदार, प्रमुख पाहुण्या म्हणून सुरेखा वांबुरकर, अनुपमा देवधर, श्री परशुराम जन्मोत्सव समितीचे मनोज दीक्षित यांची उपस्थिती होती. आत्तापर्यंत विविध प्रशिक्षणाचा सेलू शहरातील व तालुक्यातील अकराशे महिलांनी मोफत लाभ घेतला आहे, अशी माहिती फाऊंडेशने या वेळी दिली. आहे.
महिलांना प्रशिक्षण देऊन स्वबळावर उभे करण्याच्या उद्देशाने व महिला सबलीकरण हा उद्देश समोर ठेऊन देसाई फाउंडेशन व शुभंकरोती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेलूत महिलांसाठी मोफत पार्लर, संगणक व शिलाई प्रशिक्षण केंद्र ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आले होते . आत्तापर्यंत तीन-तीन महिन्याच्या अकरा बॅच पूर्ण झालेल्या आहेत. अकराशे महिल्यांनी याचा लाभ घेतला आहे.