श्रीमद् भगवद्गीता ज्ञान महोत्सवाचे आयोजन

श्रीमद् भगवद्गीता ज्ञान महोत्सवाचे आयोजन

सेलूमध्ये ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रम

सेलू : येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सेलू येथील श्री साईबाबा मंदिरात राष्ट्रीय प्रवचनकार राजयोगिनी भारतीदीदी यांच्या अमृततुल्यवाणीतून श्रीमद् भगवद्गीता ज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवानिमित्त मंगल कलश, शोभायात्रा, गीता प्रवचन, म्युझिकल एक्झरसाइज मेडिटेशन, तणामुक्त खुशनुमा जीवन शिबिर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ब्रह्माकुमारी सविता बहेन यांनी ही माहिती दिली.
सेलू शहरातील महेशनगर येथील श्रीसाईबाबा मंदिरात हा सात दिवसीय महोत्सव पार पडणार आहे.
२७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता यशवंतनगरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयापासून भव्य मंगल कलश व शोभायात्रा काढण्यात येणार आहे साईबाबा मंदिरात शोभायात्रेचा समारोप होणार आहे. महोत्सवात राष्ट्रीय प्रवचनकार राजयोगिनी भारतीदीदी यांच्या अमृततुल्यवाणीतून सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत श्रीमद् भगवद्गीता प्रवचन श्रवणाची संधी श्रोत्यांना मिळणार आहे. २८ जानेवारीपासून सकाळी सहा ते सात या वेळेत म्युझिकल एक्झरसाइज मेडिटेशन तर सकाळी सात ते आठ या वेळेत तणावमुक्त तणावमुक्त खुश नुमा जीवन शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रमाचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!