‘स्मृतिगंध’ ग्रंथ रचनात्मक कार्यासाठी प्रेरणादायी

‘स्मृतिगंध’ ग्रंथ रचनात्मक कार्यासाठी प्रेरणादायी

प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन, सेलूत ‘स्मृतिगंध’चे अनोख्या पद्धतीने प्रकाशन

सेलू/परभणी : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था ही उपक्रमशील संस्था आहे. श्रध्दा, चारित्र्य, नैतिकता, गुणवत्ता हा संस्थेचा भक्कम पाया असून ‘ स्मृतिगंध ‘ हा ग्रंथ पुढील पिढीला रचनात्मक कार्याची प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे ( लातूर ) यांनी केले.
नूतन महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्यासाधून त्यांच्यात संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्मृतिगंध’ पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.रोडे यांच्या हस्ते बुधवारी (२२ जानेवारी) रोजी अनोख्या पद्धतीने झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. या प्रसंगी प्राचार्य द.रा.कुलकर्णी, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, माजी ग्रंथपाल अरविंद जोशी, डॉ.प्रभाकर देव, डी.के.देशपांडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, गौतम सूर्यवंशी, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

प्राचार्य द.रा.कुलकर्णी म्हणाले, ” नूतन विद्यालय शिक्षण संस्था ही नैतिक मूल्यांची जोपासना करणारी संस्था आहे. स्थापनेपासूनच शैक्षणिक, सामाजिक विकास हे ध्येय घेऊन वाटचाल करणाऱ्या गुणवत्ता, चारित्र्य जपणाऱ्या नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवा.” डॉ.प्रभाकर देव, डॉ.संग्राम गवळे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात नागरिक तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या वतीने प्राचार्य कुलकर्णी यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरक्ष: वर्षाव झाला.

मयूर प्रिंटर्सचे संचालक सतीश कुलकर्णी (नांदेड) यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.कोठेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सुभाष बिराजदार यांनी केले. गौतम सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तथा साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उद्योजक रामप्रसाद घोडके, माजी जिप सभापती अशोक काकडे डॉ.राजाराम झोडगे, प्रा.हेमचंद्र हडसनकर, प्रा.मोहन पाटील, डॉ.गंगाधर गळगे, उपप्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी आदींची उपस्थिती होती.


फोटो – सेलू : सेलू ( जि.परभणी) येथील नूतन महाविद्यालयात ‘स्मृतिगंध ‘ ग्रंथाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. ( छायाचित्र : शंभू काकडे)

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!