छत्रपती संभाजीनगरचे अक्सर, यंग इलेव्हन विजेते

छत्रपती संभाजीनगरचे अक्सर, यंग इलेव्हन विजेते

सेलूतील रौप्यमहोत्सवी नितीन चषक क्रिकेट स्पर्धा 

सेलू/परभणी : सेलू येथील नितीन कला व क्रीडा युवक मंडळ यांच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय नितीन चषक क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील अक्सर संघ विजेता, तर यंग इलेव्हन संघ उपविजेता ठरला आहे.

नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ‌१५ जानेवारीपासून रंगलेल्या क्रिकेट स्पर्धेचा नऊ दिवस क्रीडाप्रेमींनी आनंद घेतला. अंतिम सामना ‌२३ जानेवारी रोजी झाला. विजेत्यांना लावणी कलावंत गौतमी पाटील यांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, आर.बी. इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक रामप्रसाद घोडके, माजी आमदार हरिभाऊ लहाने, संदीप लहाने, नामदेव डख, बाबा काटकर, मिलिंद सावंत, कल्याण पवार, हरीभाऊ काळे, पांडुरंग कावळे, अविनाश शेरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंच सय्यद जमशेद, महेश जहागीरदार, पवन फुलमाळी, यासेर शेख, विजय वाघ, सलमान सिद्दिकी, माधवअण्णा लोकुलवार, गणेश माळवे, प्रा.नागेश कान्हेकर, हमीद गुत्तेदार, बंडू देवधर, रमेश दुसारे यांच्यासह क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!