सेलू प्रिमियर लीगचे शानदार उद्घाटन
साईराज बोराडे मित्रमंडळाच्या वतीने भव्य आयोजन
सेलू जि.परभणी : सेलू प्रिमियर लीगचे शानदार उद्घाटन रविवारी, २६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे होते. प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रभाकर सुरवसे, मारोती चव्हाण, मिलिंद सावंत, माधव अण्णा लोकुलवार, वहिद अन्सारी, रमेश दौड, कासिम भाई, सचिन कोरडे, सुरेश काळे, व्यंकट बापू चव्हाण, राजेंद्र पवार, प्रकाश पवार, वल्लभसेठ राठी, लक्ष्मण बोराडे, लक्ष्मण बुरेवार, बबन गायकवाड, बालाजी सरकाळे, जनाआबा सोळंके, सुभाष चव्हाण, सुनील गायकवाड, आप्पू सोळंके, मनोज दीक्षित, संतोष बेंडे, राजू रोडगे आदींची उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी डॉक्टर्स असोसिएशन तसेच मेडिकल असोसिएशन व वकील संघ यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात आला. या वेळी डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ.परेश बिनायके, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाळासाहेब रोडगे व मेडिकल असोसिएशनचे संदीप टाक उपस्थित होते. लीगच्या विजेत्यांना प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये व चषक व द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.