ज्ञानसाधनाच्या प्रवेशपूर्व परीक्षेला मोठा प्रतिसाद
परभणी जिल्ह्यातील ५००० विद्यार्थी सहभागी
परभणी : येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेतर्फे ११ वीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसाधना शिष्यवृत्ती तसेच पूर्वपरीक्षा (डीएसईटी) या प्रवेश पूर्व परीक्षेचे रविवारी , २६ जानेवारी रोजी झाली. विविध तालुक्यातून परभणी जिल्ह्यातील ५००० विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फिसमध्ये शिष्यवृत्तीच्या रूपाने २५ ते १०० टक्क्यांपर्यंत पर्यंत सवलत दिली जाणार आहे. ज्ञानसाधना प्रतिष्ठानला नीट, जेईई, सीईटी परीक्षांच्या दैदिप्यमान निकालाची परंपरा आहे. मागील वर्षी ४००० विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन यापैकी ५००विद्यार्थ्यांना या सवलत योजनेचा लाभ मिळाला. या वर्षीच्या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा किरण सोनटक्के यांनी दिली.