विवेकानंद बालक मंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात
बाल चिमुकल्यांनी जिंकली मने
सेलू : विवेकानंद बालक मंदिरचे सिद्धिविनायक मंगल कार्यालयात उत्साहात साजरे झाले. यावेळी चिमुकल्यांनी विविध गीतांवर उत्कृष्ट समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या वेळी किरण डुघरेकर, गौतम सूर्यवंशी, सुधीर चौधरी, मकरंद दिग्रसकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व बालवाडीताई सीमा आष्टीकर, मोहिनी लोणीकर, वृषाली देशमुख, रेणुका बोठे, सेविका संजीवनी रामपूरकर यांनी पुढाकार घेतला.