ध्रुव साकोरे यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकात दोन शोधनिबंध प्रकाशित

ध्रुव साकोरे यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकात दोन शोधनिबंध प्रकाशित

ध्रुव साकोरे यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकात दोन शोधनिबंध प्रकाशित

कार्बन डायॉक्साईड उत्सर्जन, शाश्वततेच्या संकटाचा सामना आदी ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश 

परभणी : परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे पुत्र ध्रुव दिपक साकोरे यांचे दोन शोधनिबंध जर्नल ऑफ इमर्जिंग टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च (जेईटीआयआर) या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

ध्रुव साकोरे हे सध्या लंडन येथील बेस बिझनेस स्कूल येथे बीएससी फायनान्स (अर्थशास्त्र) चे शिक्षण घेत आहेत. साकोरे यांच्या पहिल्या शोध निबंधातातून कार्बन डायॉक्साईडच्या उत्सर्जनाचे मूल्यांकन, सकल राष्ट्रीय उत्पन्न ( जीडीपी), ऊर्जा वापर यांचा अभ्यास करून भविष्यकालीन विकास, ऊर्जा कार्यक्षमता आणि तांत्रिक बदल यांचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या शोध निबंधातून आजच्या जगाला शाश्वततेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पर्यावरणीय ऱ्हास, नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल, अन्न आणि पाण्यची असुरक्षितता, आर्थिक अस्थिरता, युद्ध आणि दहशतवाद वाढीस लागत आहे. आंटार्टिक खंडातील बर्फ वितळत आहे, प्रवाळ भिंती नष्ट होत आहेत. तसेच महासागराचे स्वरूप बदलत आहेत. अन्न आणि तेलाच्या किंमतीतील अलीकडील वाढ तसेच त्यासोबतच्या सामाजिक अस्थिरतेच्या धोक्यांमुळे हरित ऊर्जेमध्ये गुंतवणूक करणे आणि धक्के सहन करण्याची क्षमता निर्माण करणे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राने एकत्र येऊन हरित संक्रमणासाठी निधी उभारणे आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे किती महत्त्वाचे आहे, यावर चर्चा करण्यात आली आहे. शोध निबंध प्रकाशित झाल्याबद्दल विविध स्तरांतून साकोरे यांचे अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!