अपूर्वा पॉलीटेक्निकची पुणे येथील सह्याद्री इंडस्ट्रीजला क्षेत्रभेट

अपूर्वा पॉलीटेक्निकची पुणे येथील सह्याद्री इंडस्ट्रीजला क्षेत्रभेट

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित, अपूर्वा पॉलीटेक्निक कॉलेज, सेलू या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडावी तसेच आपण जे शिक्षण महाविद्यालयात घेत आहोत त्याचा उपयोग कंपनी मध्ये प्रत्यक्ष उत्पादन तयार करण्यासाठी कसा केला जातो या बद्दल विद्यार्थ्यांना महिती व्हावी या उद्देशाने श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील नामांकित कंपनी सह्याद्री इंडस्ट्रीजला क्षेत्रभेट देण्यात आली.

या क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांना कन्व्हेंशनल अँड नॉन कन्व्हेंशनल मशीन, सीएनसी मशीन ,फाईव्ह एस टेक्नॉलॉजी ,मटेरियल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ,इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंट ,लेझर मशीन इत्यादि विषया संदर्भात सखोल प्रात्यक्षिक माहिती कंपनीचे प्लांट हेड संजय कुलकर्णी, यशवंत कुलकर्णी, गोविंद टोमपे, रवी सोळंके यांनी दिली.

या प्रसंगी बोलतांना कंपनीचे प्लांटहेड संजय कुलकर्णी म्हणाले की आम्ही प्रथमच आपल्या महाविद्यालयास इंडस्ट्रियल भेटी साठी परवानगी दिली आहे. या पूर्वी आम्ही कोणत्याही महाविद्यालयास इंडस्ट्रियल भेटीसाठी परवानगी दिली नाही. कारण तुमच्या महाविद्यालयामुळे आम्हाला दोन हिरे मिळाले आहेत, जे की आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. भविष्यात आम्ही आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत राहू व मोठ्या प्रमाणात नौकरीच्या संधी देखील उपलब्ध करून देवू असे आश्वासन दिले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!