हजरत सय्यद शाह साहाब यांच्या उर्स यात्रेला सुरुवात

हजरत सय्यद शाह साहाब यांच्या उर्स यात्रेला सुरुवात

परभणी : सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहाब (तुरतपीर बाबा दर्गा) दर्गा एकात्मतेचे प्रतिक असून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जिल्हा प्रशासनाच्यावतीने शनिवारी‌, १ फेब्रुवारी रोजी हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहाब यांच्या मानाच्या संदलची शहरातून मिरवणूक काढेन ऊरूस यात्रेची सुरुवात झाली. या वेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी संदलचा तबक डोक्यावर घेवून संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहाब रहे यांच्या ऊरूस यात्रेला मानाच्या संदलाने सुरुवात केली. नागरिकांनी या उर्स उत्सवात सहभागी होवून कायदा व सुव्यवस्थाचे पालन करून शांततेत पार पाडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यावेळी वक्फ मंडळाचे विभागीय अधिकारी शेख सलमान, उरुस समितीचे व्यवस्थापक, जिल्हा वक्फ अधिकारी इमरान खान आदीसह भाविक उपस्थित होते. मागील अनेक वर्षापासून या मानाच्या संदलची परंपरा आजतागायत कायम असून, या यात्रेला देश व राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!