वालूरचे सरपंच-ग्रामपंचायत सदस्य पती-पत्नी अपात्र
संजय साडेगावकर यांच्याविरोधातील प्रकरणात निकाल
परभणी, प्रतिनिधी : सेलू तालुक्यातील वालूर येथे अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी आणि ग्रामपंचायत सदस्य पदाचा दुरूपयोग केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य पती-पत्नी दोघेही अपात्र ठरले आहेत. याबाबत परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच निकाल दिला आहे.
या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्य लिंबाजी कुपनवार, धारोजी धावे, चंद्रकांत हनुमंतराव चौधरी, सतीश कलाल तसेच ५ विविध कार्यकारी सोसोयटी चे चेअरमन गोरख भालेराव, वालूर येथील नागरिक वाहेदखॉ पठाण, दादामियों कुरेशी यांनी दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ॲड.ए.बी.देशपाडे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.
वालूर येथे सार्वजनिक ठिकाणी आणि महावीर चौक बाजार परिसरात अतिक्रमण केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच संजय नारायणराव साडेगावकर व ग्रामपंचायत सदस्या महानंदा साडेगावकर, कौशल्याबाई नारायणराव साडेगावकर यांनी अनधिकृतरित्या अतिक्रमण केल्याप्रकरणी आणि ग्रामपंचायत सदस्य पदाचा दुरूपयोग केल्यामुळे अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी सर्व अर्जदारांनी केली होती.
त्यानुसार भुमीअभिलेख मालमत्ता क्रमांक ८३७, ८३८ व ८३९ ही मुळ जागेपेक्षा दीडपट आढळून आली. संजय साडेगावकर, महानंदा साडेगावकर यांच्या नावे नमुना नंबर ८ ला पुर्व पश्चिम २० फुट दक्षिण उत्तर २३ तर प्रत्यक्ष मोजणी अंती पुर्व पश्चिम २९ फुट दक्षिण उत्तर ४७ फुट म्हणजे मालमत्ता क्रमांक ८३७मध्ये पुर्व पश्चिम ९ फुट तर दक्षिण उत्तर २४ फुट अतिक्रमण आढळुन आले. तर दुसरी मालमत्ता क्रमांक ८३७ मध्ये त्या पती-पत्नीच्या नावे पूर्व पश्चिम २० फुट दक्षिण उत्तर २३ ही मुळ असुन या ठिकाणी प्रत्यक्ष मोजणी अंती पुर्व पश्चिम ३० फुट दक्षिण उत्तर २६ फुट जागा आढळून आली यामध्ये पूर्व पश्चिम १० फुट आणि दक्षिण उत्तर ३ फुट अतिक्रमण आढळून आले
तिसरी मालमत्ता क्रमांक ८३८ मध्ये कौशल्याबाई साडेगावकर यांच्या नावे पुर्व पश्चिम २० उत्तर दक्षिण २३ फुट असुन मोजणीअंती पुर्व पश्चिम ३३ फुट दक्षिण उत्तर ३४ फुट आढळून आली म्हणजे पुर्व पश्चिम १३ फुट दक्षिण उत्तर ११ फुट अशा प्रकारे या ३ जागेवर महावीर चौक आठवडी बाजार मैदान कानाडी गल्लीच्या उत्तर दिशेस अनधिकृत अतिक्रमण केल्याचे आढळुन आल्यामुळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१) (ज-३) अन्वये संजय साडेगावकर यांना संरपच व ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्रेची कारवाई करण्यात आली आहे. गैरअर्जदार हे १ व २ हे पती-पत्नी असून संजय साडेगावकर हे संरपच असून गैरअर्जदार २ ह्या त्यांच्या पत्नी आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत तर गैरअर्जदार क्रमांक ३ ह्या संजय साडेगावकर यांच्या आई आहेत. या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती ॲड.ए.बी.देशपांडे यांनी दिली आहे.