राजस्थानी महिला मंडळ : अध्यक्षपदी लता गिल्डा, उज्ज्वला भाला सचिव 

राजस्थानी महिला मंडळ : अध्यक्षपदी लता गिल्डा, उज्ज्वला भाला सचिव 

सेलू : सेलू (जि.परभणी) येथील राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी लता गिल्डा यांची तर सचिव पदी उज्ज्वला भाला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येथील बालाजी मंदिरात महिला मंडळाची नूतन कार्यकारणीची निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळत्या अध्यक्षा कांचन बाहेती, सचिव पुष्पा तोष्णीवाल, उर्मिला बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत सहचिटणीस पदी ज्योती काबरा उपाध्यक्ष शर्मिला मालाणी, कोषाध्यक्ष किरण राठी यांची तर सदस्य म्हणून मीरा गिल्डा, मीना मालाणी, दीपा परताणी कीर्ती मंत्री, प्रिती राठी, अंकिता तोष्णीवाल, स्मिता गिल्डा, गीता करवा, पद्मा मंत्री, अश्विनी बिहाणी, दया दायमा, शितल दोडिया, विद्या व्यास, नेहा लोया ,रामेश्वरी लोया, रूपाली जाजू, पूजा तोष्णीवाल यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे या वेळी स्वागत करण्यात आले‌.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!