विवेकानंद विद्यालयात रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके
सेलू : भारतीय संस्कृती मध्ये अनेक उत्सव हे उस्फुर्त पणे साजरे केले जातात त्यानुसार रथसप्तमी निमित्ताने, मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात सूर्यनमस्कार घेण्यात आले. यावेळी हरिभाऊ चौधरी यांनी संस्कृती जपणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन केले. या वेळी शाळेतील सहशिक्षक विनोद मंडलिक यांनी सूर्यनमस्काराचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. सूर्यनमस्काराचे बारा प्रकार समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल कौसडीकर, गजानन साळवे, चेतन नाईक, काशिनाथ पांचाळ यांनी प्रयत्न केले.