सेलूतील नूतन कन्या प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात

सेलूतील नूतन कन्या प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात

विद्यार्थ्यांनी स्वतःचे कार्यकौशल्य विकसित करावे : डॉ.रोहिणी देशपांडे

सेलू/परभणी : गुणांच्या टक्केवारीच्या मागे धावू नका, स्वतःच्या कलागुणांना वाव देत, कार्य कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन डॉ.रोहिणी देशपांडे-सुतवने यांनी केले आहे.

सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.देशपांडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, दत्तरावजी पावडे, शिक्षक प्रतिनिधी सतीश कुंडीकर, कैलास मलवडे, मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परशुराम कपाटे, पर्यवेक्षक दत्तराव घोगरे, माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सुवर्णा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाहुण्यांचे लेझीमच्या पथकासह औक्षणाद्वारे स्वागत झाले. याप्रसंगी उल्लेखनीय कार्याबद्दल शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती आणि प्रशालेतील क्रीडा शिक्षक किशोर ढोके यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट विद्यार्थिनी, उत्कृष्ट खेळाडू, कलारत्न पुरस्काराने प्रशालेतील विद्यार्थ्यिनींना सन्मानित करण्यात आले. स्पर्धा परीक्षा, चित्रकला परीक्षा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, वर्ग सजावट स्पर्धा, महिला पालकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा, कै.दुर्गाताई कुलकर्णी कथाकथन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्वागत गीत पूजा महाजन आणि संच यांनी सादर केले.

सूत्रसंचालन कीर्ती राऊत, श्रेया राऊत, ज्ञानेश्वरी रासवे, अपेक्षा मोगल यांनी केले. आभार पर्यवेक्षक दत्तराव घोगरे यांनी मानले. सुहास देऊळगावकर, उपेंद्र दिवाळकर, सुषमा दामा, वैशाली चव्हाण, सीमा सुकते, ज्योती कुंभकर्ण, सुनील मोगल, प्रकाश खराटे, किशोर ढोके, सपना पाटनी, विजय धापसे, रेणुका आंबेकर यांनी यादीवाचन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर, शशिकांत देशपांडे, नागेश देशमुख, संगीता खराबे, शंकर बोधनापोड, बाबासाहेब थोरे, अनंता बोराडे, विनोद शिंदे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!