महारोजगार मेळाव्यात 319 उमेदवारांची प्राथमिक निवड
परभणी : महाराष्ट्र शासनाच्या 7 कलमी कृती कार्यक्रम अंतर्गत 100 दिवसाच्या कृती आराखड्यानुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्यो्जकता मार्गदर्शन केंद्र, परभणी तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी श्री शिवाजी महाविद्यालय कॅम्पस, परभणी येथे “पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा” आयोजीत करण्यात आलेला होता. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले व उद्घाटन प्रसंगी त्यांनी उमेदवारांना विविध सेक्टर मधील कौशल्य विकास प्रशिक्षण घेवून आपले ज्ञान वृध्दींगत करण्याचे मत प्रतिपादीत केले जेणेकरुन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
या मेळाव्यात बारावी, आयटीआय, डीप्लोमा, पदवी, बी.ई. पॉलिटेक्नीक, फार्मसी इत्यादी शैक्षणीक पात्रता धारक उमेदवारांसाठी 23 कंपन्यांव्दारे अप्रेंटिशिप, ट्रेनी, सर्वेअर, रिलेशनशिप मॅनेजर, विमा सल्लागार, इनव्हेसमेंट बँकर बीमा सखी, सेल्स ऑफिसर, केमीस्ट, इनव्हेस्टर एक्झेकेटिव्ह, प्रोडक्शन वर्कर, हाऊस किपीर, वेल्डर, प्लंबर, मेसन (मिस्त्री), इलेक्ट्रेशियन इत्यादी 959 पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. या मेळाव्यास 510 उमेदवार उपस्थित होते त्यापैकी 319 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली व निवड केलेल्या 3 उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आल्याची माहिती प्र.सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता परभणी यांनी दिली आहे.
मेळावा यशस्वी होण्यासाठी प्राचार्य शाहिद ठेकिया, आनंद पाथरीकर, बाळासाहेब जाधव तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी प्लेसमेंट समन्वय पी. के. विभुते, पी.डब्लू. रणखांब, ए.ए.लोहट, प्राध्यापक श्री. वाढवे आणि सुदाम चव्हाण, सुमित दिक्षीत, प्रविण रुद्रकंठवार, अंकुश कदम, प्रियंका कणके, आकाश माळेकर, राहूल काळे, शेख करिमोद्दीन यांनी सहकार्य केले.
—-*