डॉ.मयूर डख यांचे एमडी मेडिसीन परीक्षेत उज्ज्वल यश
सेलू (जि.परभणी) : येथील डॉ.मयूर माणिकराव डख यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी (मेडीसीन) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याआधी त्यांनी मुंबई येथील नायर मेडीकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. या यशाबद्दल डॉ.मयूर यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.