‘द मदर्स’ शाळेचे स्नेहसंमेलन रंगले
सेलू : शहरातील द मदर्स प्रि-प्रायमरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुण्या जयश्री सोन्नेकर इंजिनिअर तथा अलफ्लाह एजयुकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिस कुरेशी इंजिनियर, उपाध्यक्ष महेमूदसर होते. पठाण निसार, शिक्षक मौजम, संचालक इम्रान कुरेशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक व देशभक्तीपर कला नृत्य सादर केले. प्राचार्य स्वाती नावाडे यांनी स्वागत केले. या प्रसंगी विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके वाटप करण्यात आली. चिमुकल्यांच्या रंगारंग कार्यक्रमाने पालक व प्रेक्षकांना मोहीत केले.